निशब्द आहे

आज मी परत निशब्द आहे 
इथुनी पुढे माझा प्रारब्ध आहे  
भिजुनी गेला आत्मा या चिंब पावसाने 
अजुनी गात्री तहान तशीच आहे ..... 

उदासीन आहे जाण्याने तुझ्या मी 
आठवणीतला माझा प्रवास आहे 
काय देणार मी या जगाला 
परत हात माझे बंधिस्त आहे ..... 

चल पापण्यात प्रतिबिंब शोधू 
नदीच्या पात्रात अजूनही जीव आहे 
सांगून गेला वारा नाव तुझे 
कळले तुला वाट माझीच आहे 


Comments