UNTITLED--Marathi
चालतो त्या वाटेवर ज्या अंत नसे ना पाऊलखुणा
परतीचा मार्ग नसावा नको सुरवातीचा हट्ट पुन्हा
पूर्ण होण्या करिता मनी किती झुरावे आता
शब्दातून डोळ्यांचा हा प्रवास नको पुन्हा
चारित्र्य घडवुनी जातो भंग एक वस्त्रावरचा ..
पुसता ते संपत नाही उगा मनूच्या चर्चा
कुठेले ते देवकीचे सूत आले नि गेले जगती
एक विचार देउनी गेले एक खंड जोपासण्यासाठी
गळते ते घर अजुनी ज्यावरी वस्त्र ओढलेले
मन कोमेजून कोपऱ्यात बसले ओले चिंब भिजलेले
तू डाव खेळण्या करिता मांडू नको संसार अवघा
तू तुझपाशीच राहू दे .. मी बरा आहे पोरका ...
आलमपनाह .....
Comments
Post a Comment